स्टीव्ह स्मिथचा रडीचा डाव ; पिच खराब करताना स्मिथला रंगेहात पकडलं (VIDEO)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं मैदानात येताच खेळाची सूत्रं हाती घेतली. पंत एका बाजूनं आक्रमण करत होता, तर चेतेश्वर पुजारा दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सना या जोडीनं चांगलंच हतबल केलं होतं. याचवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ याने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळला.

जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा पंत आणि पुजारा पाणी पिण्यासाठी बाजूला निघून गेले. खेळपट्टीवर आणि विशेषत: फलंदाजी करतात त्या जागेवर कोणी नसल्याचं पाहिल्यावर स्मिथ तेथे आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्यानंतर पंतने क्रीजवर फलंदाजीसाठी करून ठेवलेल्या खुणा पायाने पुसून टाकल्या. त्यामुळे पंतला खेळ सुरू झाल्यावर पुन्हा एकदा बॅटने पंचांच्या मदतीने गार्ड घेऊन त्या खुणा कराव्या लागल्या.

मॅच जिंकण्यासाठी रडीचा डाव खेळणे ही स्मिथची जुनी सवय आहे. 24 मार्च 2018 या दिवशी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये कॅमेरुन बॅनक्राफ्ट बॉलवर सँड पेपर रगडताना सापडला होता. त्यानंतर या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like