Stock Market: सेन्सेक्स 300 अंकांनी खाली आला तर निफ्टी 16450 वर बंद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी म्हणजेच शुक्रवारी घसरणीसह शेअर बाजार उघडला. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 300.17 अंक किंवा 0.54 टक्क्यांच्या घसरणीसह 55,329.32 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निर्देशांक निफ्टी 118.35 अंकांनी किंवा 0.71 टक्क्यांनी कमी होऊन 16,450.50 वर बंद झाला.

हेवीवेट्समध्ये बजाज फायनान्स, ब्रिटानिया, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले तर हिंडाल्को, टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि यूपीएलचे शेअर्स रेड मार्क वर बंद झाले. सेक्टरल इंडेक्स बद्दल बोलताना, FMCG वगळता, सर्व क्षेत्र रेड मार्कवर बंद झाले. यामध्ये पीएसयू बँक, फार्मा, आयटी, फायनान्स सर्व्हिस, ऑटो, मीडिया, प्रायव्हेट बँक आणि मेटल, रियल्टी यांचा समावेश आहे.

यापूर्वी, NSE आणि BSE 19 ऑगस्ट रोजी मोहरममुळे बंद होते. यासह, घाऊक कमोडिटी मार्केटसह मेटल आणि सराफा बाजार देखील बंद होते. forex and commodity futures markets मध्ये कोणतीही ट्रेडिंग एक्टिविटी नव्हती.

बाजार एका दिवसापूर्वी विक्रमी उच्चांकावर बंद झाला
त्याच वेळी, बुधवारी (18 ऑगस्ट) विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स 162.78 अंक किंवा 0.29% घसरून 55,629.49 वर बंद झाला, तर निफ्टी 45.80 अंक किंवा 0.28% घसरून 16,568.80 वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 56,118.57 आणि 16,701.85 च्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.