Stock Market : सेन्सेक्स 134 तर निफ्टी 15850 च्या पुढे बंद झाला

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार बुधवारी ग्रीन मार्कमध्ये बंद झाला आहे. बुधवारचा दिवस आयटी आणि आयटी आधारित कंपन्यांचा होता. ट्रेडिंग संपल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 134.32 अंक म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या तेजीसह 52,904.05 वर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 41.60 अंकांनी किंवा 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 15,853.95 वर बंद झाला.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, DA मध्ये 11 टक्के वाढ
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरील बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. अशा प्रकारे, DA मध्ये एकूण 11 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group