Stock Market : शेअर बाजारात घसरण ! Sensex 52,482 तर Nifty 15,721 वर बंद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आठवड्याच्या तिसर्‍या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE Sensex 66.95 अंक म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 52,482.71 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 26.95 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 15,721.50 वर बंद झाला. आज मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, रिअल्टी, बँकिंग आणि पीएसयू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव होता. या क्षेत्रातील शेअर्सना फटका बसला आहे.

हे शेअर्स खाली आहे
BSE वर ट्रेडिंग संपल्यानंतर पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तोटा झाला. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, एलटी, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, एम अँड एम, एशियन पेंट्स, आयटीसी, सन फार्मा, एचडीएफसी बँक, डॉ रेड्डीज आणि इंडसइंड यांचा समावेश नुकसान झालेल्या शेअर्समध्ये आहे. आज BSE च्या 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी 12 शेअर्समध्ये वाढ झाली आणि 18 शेअर्सची घसरण झाली. याखेरीज NSE च्या 50 कंपन्यांच्या शेअर्सपैकी 33 शेअर्समध्ये घट दिसून आली आहे.

या शेअर्समध्ये वाढ झाली आहे
त्याचबरोबर BSE वर आज इन्फोसिस, रिलायन्स, नेस्ले इंडिया, मारुती, टेक महिंद्रा, अल्ट्रा सिमेंट, टायटन, बजाज ऑटो, टीसीएस, एचसीएल टेक, कोटक बँक आणि भारती एअरटेल यांचा सर्वाधिक फायदा झाला.

आजचे टॉप -5 गेनर्स आणि लूजर्स
NSE मध्ये आज टाॅप गेनर्समध्ये कोल इंडिया, रिलायन्स, डिव्हिस लॅब, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचा समावेश होता. त्याचबरोबर आज लूजर्समध्ये श्री सिमेंट, बजाज फेन्ड्रल, पॉवर ग्रिड, यूपीएल, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स होते.

3,359 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले
क्लोजिंगच्या वेळी आज BSE वर सुमारे 3,359 कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. त्यापैकी 1,707 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली असून 1,530 कंपन्यांची घसरण दिसून आली. आजची एकूण मार्केटकॅप सुमारे 2 कोटी 29 लाख रुपये होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment