Stock Market – शेअर बाजारात फ्लॅट ट्रेडिंग, सेन्सेक्स 60,030 वर ट्रेड करत आहे; IRCTC च्या शेअर्समध्ये घसरण

नवी दिल्ली । वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आज शुक्रवारी बाजार रेड मार्कवर उघडला. BSE सेन्सेक्स 470.93 अंकांनी म्हणजेच 0.79% घसरून 59,513.77 वर उघडला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 130.75 अंकांनी म्हणजेच 0.73 टक्क्यांनी घसरून 17,726.50 वर उघडला.

FII आणि DII आकडे
28 ऑक्टोबर रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 3,818.51 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 836.60 कोटी रुपयांची खरेदी केली.

बजाज फिनसर्व्हचे बहुतांश शेअर्स 3.22% नी घसरत आहेत. याशिवाय इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 3.16% ने घसरण झाली. त्याच वेळी, सन फार्मा, एलटी, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, एनटीपीसी, कोटक बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एशियन पेंट, नेस्ले इंडिफा, इन्फोसिस, मारुती, भारती एअरटेल बजाज ऑटोच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक 1.22% वाढ दिसून आली. याशिवाय टायटन, एचसीएल टेक, आयटीसी, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी 11 शेअर्समध्ये वाढ तर 19 शेअर्स घसरले आहेत.

अदानी पोर्ट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, डिव्हिस लॅब, एचसीएल टेक हे NSE वर टॉप गेनर ठरले आहेत. त्याचवेळी HDFC, IndusInd Bank, Axis Bank, Kotak Bank आणि Reliance हे टॉप लुझर्स ठरले आहेत.