बार्शीच्या ‘त्या’ तरुणाला बनायचं होतं पाब्लो एस्कोबार; 200 कोटींची फसवणूक करुन दुबईला पळाला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा पैसे डबल करून देतो, पाच वर्षांत पैसे डबल अशा स्कीम आपण पहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. त्यामुळे आपण लगेच त्यामध्ये थोड्या जास्त पैशांच्या हव्यासापायी आपण ह्यामध्ये आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवतो. यानंतर काही दिवसांनी आपल्यासोबत धोका झाल्याचे समजते आणि आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. अशीच काहीशी घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यात घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बार्शीमध्ये एका व्यक्तीने तीन महिन्यात दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीतील लोकांकडून 200 कोटी रुपये जमा केले आणि अचानक तो हे सगळे पैसे घेऊन गायब झाला. त्यामुळे, पैसे मिळण्याच्या आशेनं गुंतवणूक केलेल्या लोकांमध्ये आता आपले पैसे मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बार्शीसह संपूर्ण तालुक्यात या शेअर मार्केट गुंतवणूकदारांचीच चर्चा रंगली आहे. या व्यक्तीने महिन्याला फिक्स पाच ते दहा टक्के रिटर्न देतो अशी स्कीम गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सांगितली. तसेच त्याने आपण आयपीओच्या ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करतो असेदेखील सांगितले. यामधून तो दर महिन्याला दोन आयपीओ होतात, असे सांगत एक आयपीओला साधारणपणे 15 ते 20 टक्के रिटर्न आले असे सांगत मुद्दल, व्याज कंपौंडिंग करीत पुढील आयपीओला लावून महिन्यात 30 ते 35 टक्के रिटर्न मिळवून देतो असे म्हणून तो गुंतवणूकदारांना आकर्षित करत होता.

या व्यक्तीच्या स्वतःच्या तीन कंपन्या होत्या. त्याची विविध बँकांत खाती होती. तो लोकांकडून अकाउंट आणि कॅश रक्कम घेत होता. त्याच्याकडे लोकांनी कमीत कमी पाच लाख ते कोट्यवधी रुपयांची त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. या व्यक्तीकडे अनेक लोकांनी घर, जमीन गहाण ठेवून, सोने बँकेत ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. या व्यक्तीकडे बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरासोबत पुणे, सांगली या भागातील अनेक लोकांच्या गुंतवणुका त्याच्याकडे होत्या.

पैसे घेऊन आरोपी फरार
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव विशाल फटे असे आहे. रविवारी हा व्यक्ती लोकांचे पैसे घेऊन आपल्या पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला घेऊन कुटुंबासमवेत फरार झाला आहे. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद लागत आहे. त्यामुळे त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली आहे .

किती जणांनी केली गुंतवणूक
आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून बार्शी शहरातील लोकांनां आकर्षक परताव्याचे अमिश दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आतापर्यंत 6 लोकांनी जवळपास 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण रा.उपळाई रोड बार्शी यांच्या विरोधात भा.द. वि.कलम 420 , 409, 417 , 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधीनियम 1999 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधित कंपनी सील करण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती अप्पर अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलीय.

Leave a Comment