नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण होते. आयटी क्षेत्रातील शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतल्यानंतर शेअर बाजार मोठ्या तेजीने बंद झाला आहे. सेन्सेक्स 477.24 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी वाढून 57,897.48 वर बंद झाला आणि निफ्टी 150.35 अंकांनी वधारून 17,236.60 अंकांवर बंद झाला.
बीएसईवर आज इंट्राडेमध्ये अजंता फार्माच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि तो 2,310 रुपयांपर्यंत गेला. कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांच्या बोर्डाने शेअर बायबॅक प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावित बायबॅकची रेकॉर्ड तारीख 14 जानेवारी 2022 निश्चित करण्यात आली आहे.
बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स वाढले
आजच्या ट्रेडिंगमध्ये बीएसईच्या जवळपास सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये वाढ दिसून आली. आयटी, ऑटो, एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे मेटल, फार्मा, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी झाली.
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स वधारत आहेत आणि दोन घसरत आहेत. प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये, एशियन पेंट्स 2.85 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला. याशिवाय सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्रा सिमेंट, टायटन, एनटीपीसी, एलटी, टेक महिंद्रा, रिलायन्स, एचसीएल टेक, आयटीसी इत्यादींनी नफा नोंदवला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स वाढीसह बंद झाले
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 24,653.89 वर बंद झाला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 1.43 टक्क्यांच्या वाढीसह 28,514.92 वर बंद झाला.