Stock Market : सेन्सेक्स 1,500 अंकांनी चढून 61 हजारांच्या जवळ तर निफ्टीने पार केला 18 हजारांचा टप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने आज सर्व अंदाजांना मागे टाकले आणि सेन्सेक्सने पुन्हा 60 हजारांची पातळी ओलांडली. सोमवारी सकाळपासूनच ट्रेडिंगला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सेन्सेक्स 487 अंकांच्या वाढीसह 59,764 वर उघडला आणि ट्रेडिंगला सुरुवात झाली. निफ्टीनेही 139 अंकांच्या वाढीसह 17,809 वर ट्रेडिंगला सुरू केला. गुंतवणूकदारांनी आज आत्मविश्वास दाखवत जोरदार खरेदी केली, त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा 60 हजारांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.

सकाळी 10.05 वाजता, सेन्सेक्स 1,505 अंकांनी वाढून 60,781 वर पोहोचला होता, तर निफ्टी 403 अंकांनी वाढून 18,073 वर ट्रेड करत होता. दोन्ही एक्स्चेंजवर गुंतवणूकदारांनी जोरदार सट्टा लावला.

‘या’ क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली
आज, सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बँक आणि ऊर्जा क्षेत्रने 1 ते 2 टक्क्यांची झेप घेतली आहे. एचडीएफसी, बंधन बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये निफ्टी बँकेत 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांनी वाढ होत आहे.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक 8 टक्क्यांनी वधारले
आज, सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेने 8 आणि 7 टक्क्यांनी जबरदस्त वाढ नोंदवली आहे. याशिवाय बजाज फायनान्स, टायटन, टेक एम, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेकमध्येही तेजी दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

तत्पूर्वी, प्री-ओपनिंग सत्रातच बाजाराने तेजीचे संकेत दिले होते. प्री-ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स 353.09 अंकांनी वाढून 59,630 वर पोहोचला होता, तर निफ्टी 33.70 अंकांनी वाढून 17,637 वर ट्रेड करत होता.

आशियाई बाजारात संमिश्र कल
आशियातील प्रमुख शेअर बाजारांनी सोमवारी रेड मार्कसह सुरू केला. सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये 0.15 टक्क्यांची घसरण झाली आहे. या बाजाराचा भारतीय गुंतवणूकदारांच्या भावनांवर सर्वाधिक परिणाम होतो. मात्र, जपानच्या निक्कीमध्ये 0.02 टक्के आणि दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.29 टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी आज भारतीय शेअर बाजार दबावाखाली राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment