नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी शेअर बाजारामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीने आपली नवीन सऑल टाइम हाई लेव्हल केली आहेत. निफ्टी 97.80 अंक म्हणजेच 0.64 टक्क्यांनी 15,435.65 वर बंद झाला. त्याचबरोबर BSE चा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (BSE Sensex) 307.66 अंक म्हणजेच 0.60 टक्क्यांनी वधारून 51,422.88 च्या अखेरच्या उच्चांकावर बंद झाला. BSE वर 30 पैकी 14 शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर NSE ईतील 50 पैकी 27 शेअर्स घसरणीने बंद झाले. यापूर्वी सेन्सेक्स 295.78 अंक म्हणजेच 0.58 टक्क्यांनी, व्यापार सुरू होताना 51,411.00 वर उघडला. निफ्टी 79.75 अंक किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 15,417.60 विक्रमी पातळीवर उघडला.
या शेअर्समध्ये झाली वाढ
BSE वर आज बाजारात रिलायन्सचा स्टॉक सर्वाधिक 5.90 टक्क्यांनी वधारला. यानंतर एम अँड एम शेअर्समध्ये 2.14 टक्क्यांनी वाढ झाली. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, इंडसइंड बँक, कोटक बँक, आयटीसी, भारती एअरटेल, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, मारुती आणि इन्फोसिसमध्ये तेजी दिसून आली. त्याच वेळी सन फार्मा 4.30 टक्क्यांनी घसरला. यानंतर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डी, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, अल्ट्रा टेक सिमेंट, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, टीसीएस, बजाज ऑटो, टायटन, अॅक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, एलटी आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स घसरण होऊन बंद झाले.
हे आहेत आजचे टाॅप गेनर्स आणि लूजर्स
आज टाॅप गेनर्स मध्ये रिलायन्स राहिला आहे. यानंतर, अदानी पोर्ट्स, ग्रॅसिम, एम अँड एम आणि कोल इंडियाचे शेअर्स नफ्यात होते. त्याच वेळी, सन फार्मा, श्रीकेईएम, बजाज फिनसर्व्ह, डीआर. रेड्डी, बजाज फायनान्सचे नुकसान झाले आहे.
1,434 कंपन्यांचे शेअर्स वाढले
BSE वर आज 3,278 कंपन्यांचे शेअर्सनि ट्रेडिंग केले. त्यापैकी 1,434 मध्ये वाढ दिसून आली तर 1,433 कंपन्यांची घसरण झाली. आजची मार्केटकॅप 2 कोटी 21 लाख रुपये आहे.
OIL & GAS सेक्टरच्या शेअर्सना फायदा झाला
BSE MidCap 0.12 टक्क्यांनी घसरला. BSE SmallCap मध्ये 0.48 टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर सेक्टरल इंडेक्सच्या बाबतीतही आज मेटल कंपन्यांचा स्टॉक वाढत आहे. OIL & GAS च्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याच वेळी, पॉवर सेक्टरच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. रिअल्टी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा