Stock Market : सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा जास्तीने घसरला तर निफ्टी 17650 च्या खाली बंद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बुधवारी बाजाराने वाढीसह सुरुवात केली, मात्र संपूर्ण ट्रेडिंगच्या दिवसादरम्यान नफा-बुकिंगने बाजारावर वर्चस्व गाजवले आणि सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 555.15 अंक किंवा 0.93 टक्क्यांच्या घसरणीसह 59,189.73 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 193.50 अंकांनी किंवा 1.09 टक्क्यांनी कमी होऊन 17,628.80 वर बंद झाला.

आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला. सेन्सेक्स 445.56 अंकांनी किंवा 0.75 टक्क्यांनी वाढून 59,744.88 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी देखील 131.00 अंक किंवा 0.74 टक्के वाढीसह आज 17,822.30 च्या उच्चांकावर बंद झाला.

LIC IPO: सरकार विदेशी गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी देऊ शकते
परदेशी गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मध्ये 20 टक्के गुंतवणूक करण्यास मान्यता मिळू शकते. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार विदेशी गुंतवणूकदारांना LIC मध्ये 20% पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारही LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील.

Leave a Comment