Stock Market – सेन्सेक्स 433 अंकांनी घसरून 59,919 वर बंद झाला, निफ्टीही घसरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वीकली एक्सपायरीचा दिवस शेअर बाजारासाठी चांगला नव्हता. वाईट जागतिक संकेतांनी बाजाराचा मूड खराब केला आहे. BSE सेन्सेक्स 433.13 अंकांनी म्हणजेच 0.72 टक्क्यांनी घसरून 59,919.69 वर बंद झाला. NSE चा निफ्टी 143.60 अंकांनी म्हणजेच 0.8 टक्क्यांनी घसरून 17,873.60 अंकांवर बंद झाला.

आज सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 6 शेअर्स वाढीने बंद झाले आणि 24 शेअर्स घसरणीने बंद झाले. यामध्ये टायटनचा शेअर 1.67% पर्यंत वाढला, तर सर्वात मोठी घसरण SBI च्या शेअरमध्ये दिसून आली. SBI चा शेअर 2.83% पर्यंत घसरला.

‘या’ शेअर्समध्ये वाढ झाली आहे
टायटन, एमअँडएम, रिलायन्स, टीसीएस, टाटा स्टील आणि इंडसइंड बँक हे आज BSE वर सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, जर आपण घसरण झालेल्या शेअर्सबद्दल बोललो तर, SBI, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, सन फार्मा, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एक्सिस बँक, कोटक बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर , एलटी मारुती, अल्ट्रा टेक सिमेंट, एचसीएल टेक, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, बजाज ऑटो आणि डॉ. रेड्डीजचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.

आजचे टॉप 5 गेनर्स आणि लूजर्स
आज Titan, Hindalco, Jsw Steel, TCS, M&M चे शेअर्स गेनर्समध्ये होते. दुसरीकडे, एसबीआय, ओएनजीसी, बजाज फिनसर्व्ह आणि टेक महिंद्रा आज घसरले. आज बहुतांश बँकिंग शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. सर्वात मोठी घसरण रियल्टी, पीएसयू बँक, ऑटो शेअर्समध्ये झाली आहे. दिग्गज शेअर्सप्रमाणेच आज लहान-मध्यम शेअर्समध्येही दबाव होता. बीएसईचा मिड कॅप इंडेक्स आज 0.64 टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे, स्मॉलकॅप इंडेक्स 0.54 टक्क्यांच्या घसरणीने बंद झाला.

आणखी एका कंपनीचा IPO येईल
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स (FSBFL) ने त्यांच्या IPO च्या मंजुरीसाठी SEBI कडे अर्ज दाखल केला आहे. कंपनीला या IPO मध्ये ऑफर फॉर सेलद्वारे 2,751.95 कोटी रुपये उभे करायचे आहेत. Five Star Business Finance चेन्नई स्थित NBFC आहे जी लहान आणि मध्यम व्यवसायांना सिक्योर्ड बिझनेस लोन देते. कंपनीचे दक्षिण भारतात मजबूत अस्तित्व आहे.

Leave a Comment