Stock Market : सेन्सेक्स 764 अंकांनी तर निफ्टी 1 टक्क्यांनी घसरला

नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 764.83 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 57,696.46 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी 204.95 किंवा 1.18 टक्क्यांनी घसरून 17,196.70 वर बंद झाला.आजच्या ट्रेडिंगच्याशेवटच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 5 शेअर्स तेजीत आहेत तर 25 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एलटीच्या शेअर्समध्ये वाढ होत राहिली तर सर्वात मोठी घसरण पॉवर ग्रीडच्या शेअर्समध्ये झाली. पॉवर ग्रिडचा शेअर 4 टक्क्यांहून जास्तीने घसरला.

बहुतांश शेअर्स खाली आले आहेत
पॉवर ग्रिडच शेअर्स 4.03 टक्क्यांनी खाली आला आहे. यानंतर रिलायन्सचा शेअर 2.80 टक्क्यांनी घसरला. एशियन पेंट, कोटक बँकेचे शेअर्स 2-2 टक्क्यांहून जास्तीचे घसरले आहेत. टेक महिंद्रा, मारुती, भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, डॉक रेड्डी, एमअँडएम, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, एसबीआयचे शेअर्स 1% पेक्षा जास्तीने घसरले. एलटी, इंडसइंड बँक, अल्ट्रा सिमेंट आणि टाटा स्टील आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये हलकी खरेदी दिसून आली.

आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, एफएमसीजी, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आयटी, फार्मा, ऑटो शेअर्सवर दबाव होता. लहान-मध्यम शेअर्सची हालचालही आज सपाट पातळीवर राहिली. बीएसई मिडकॅप इंडेक्स आज 0.03 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

ONGC रिएन्यूबल एनर्जी सेक्टरमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत
ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने रिएन्यूबल एनर्जी, विशेषत: सोलार एनर्जीमध्ये आपली पोहोच वाढवण्यासाठी गुरुवारी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत करार केला. या करारांतर्गत, ONGC आणि SECI सोलार विंड ,सोलर पार्क, ईवी व्हॅल्यू चेन, ग्रीन हायड्रोजन आणि स्टोरेजशी संबंधित रिएन्यूबल प्रोजेक्ट्सवर सहयोग करतील. ONGC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार आणि SECI चे व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

You might also like