नवी दिल्ली । वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) चांगली खरेदी झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 520.68 अंकांनी वधारला आणि 50,029.83 च्या पातळीवर बंद झाला. आज अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्सने 50 हजारांची पातळी ओलांडली आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 176.65 अंकांच्या वाढीसह 14,867.35 च्या पातळीवर बंद झाला आहे.
घसरण झालेले 4 शेअर्स
आजच्या व्यवसायानंतर TCS, Nestle Ind, HDFC Bank आणि HUL रेड मार्कवर बंद झाले आहेत. याशिवाय 26 शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद आहेत.
दिग्गज शेअर्सची लिस्ट
टॉप गेनर्स शेअर्सच्या लिस्टमध्ये IndusInd Bank चा समावेश आहे. त्याशिवाय Kotak Bank, Bajaj Fin, Axis Bank, Sun Pharma, ICICI Bank, Bajaj Auto, ONGC, HCL Tech, LT, SBI, ITC मध्ये चांगली खरेदी झाली.
सेक्टरल इंडेक्स
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना, आज कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्रीची नोंद आहे. या व्यतिरिक्त सर्व क्षेत्रे काठावर बंद आहेत. दिवसभर ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, पीएसयू, टेक, आयटी, हेल्थकेअर आणि ऑईल अँड गॅसमध्ये चांगली खरेदी झाली.
स्मॉलकॅप-मिडकॅप इंडेक्स
>> बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 422.36 अंकांनी वाढून 21071.69 च्या पातळीवर बंद झाला.
>> मिडकॅप इंडेक्स 335.09 अंकांच्या वाढीसह 20516.40 च्या पातळीवर बंद झाला.
>> तसेच सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सने 424.60 अंकांची उडी मारली आणि 24117.80 च्या पातळीवर बंद झाला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा