राज्यात २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन लागण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या बाबतची महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात तूर्तास लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं म्हणत टोपे यांनी २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन लागण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलतांना टोपे म्हणाले की, राज्यात तूर्तास लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन एप्रिल पासून राज्यात लॉक डाऊन असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मात्र याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे लॉकडाउन बाबत सरकारला तशी तयारी करून ठेवणे गरजेचे असते. राज्यात 50 टक्के लॉक डाऊन लागणार हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावलं.

कठोर निर्बंध लावणार

सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसात या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे. असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.

यावेळी पुढे बोलतांना टोपे म्हणाले की गर्दीच्या ठिकाणी नागरिक कमीत कमी पंधरा दिवस गेले नाहीत तर करोना ची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. असे देखील राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment