Stock Market : नफावसुलीमुळे बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण, गुंतवणूकदारांनी आज ‘हे’ शेअर्स विकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह ट्रेड सुरू केले. बाजार उघडताच गुंतवणूकदार विक्रीसाठी तुटून पडले आणि सेन्सेक्स पुन्हा 59 हजारांच्या जवळ आला.

सकाळी 207 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्सने 59,403 वर खुले होऊन ट्रेड सुरू केला, तर निफ्टी 85 अंकांनी घसरून 17,723 वर उघडला. बाजार तोट्यात उघडूनही, गुंतवणूकदारांनी नफावसुली थांबवली नाही आणि लवकरच बाजार मोठ्या तोट्याकडे गेला. सकाळी 9.31 वाजता सेन्सेक्स 382 अंकांच्या घसरणीसह 59,229 वर ट्रेड करत होता, तर निफ्टी 96 अंकांनी घसरून 17,712 वर पोहोचला.

आज ‘या’ क्षेत्रांत आश्चर्यकारकरित्या वाढ होते आहे
गुंतवणूकदारांनी आज काही क्षेत्रांत खरेदी केली तर इतरत्र विक्रीचा दबदबा राहिला. फार्मा, एनर्जी आणि रिअल इस्टेट शेअर्सच्या मजबूत कामगिरीमुळे या क्षेत्रांमध्ये आज 1 टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, आयटी शेअर्सनी आज कमकुवतपणाने ट्रेड सुरु केले, ज्यामुळे या क्षेत्रात 1 टक्क्यांची मोठी घसरण झाली.

घसरणीनंतरही, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये 0.5 टक्क्यांची उडी दिसत आहे. बीएसएनएलमधील विलीनीकरण पुढे ढकलल्याच्या वृत्तानंतर एमटीएनएलच्या शेअर्समध्ये आज 4 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे.

या शेअर्समध्ये मोठी घसरण
गुंतवणूकदारांनी आजच्या व्यवसायात एचडीएफसी ट्विन्स, मारुती, टायटन, विप्रो, रिलायन्स, टीसीएस, कोटक बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स विकले, त्यात 2 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. हे स्टॉक टॉप लूजर्सच्या श्रेणीत आले आहेत. याशिवाय ओएनजीसी आणि यूपीएलचे शेअर्सही निफ्टीवर टॉप लूजर्सच्या श्रेणीत दिसतात.

या शेअर्सनी ताकद दाखवली
बाजारातील घसरणीच्या दरम्यान अनेक शेअर्सनी मोठी वाढ केली. आज डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, सन फार्मा, टाटा स्टील, सिप्ला, डिव्हिस लॅब्स, एचयूएल, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सवर गुंतवणूकदार जोरदार सट्टा लावत आहेत. यासह या कंपन्यांचे शेअर्स आज टॉप गेनर्सच्या श्रेणीत आले आहेत.

Leave a Comment