Wednesday, June 7, 2023

भारतीय शेअर बाजारात झाली सप्टेंबरमधील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी आला खाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी बीएसईचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स (Sensex Live Update) सेंसेक्स 600 अंकांनी खाली आला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (Nifty Live Update) 150 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला आहे. टेक्नोलॉजीच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारामध्ये मोठी झाली घसरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी अमेरिकेचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स डाओ जोन्स 800 पेक्षा अधिक गुणांनी घसरला. तो 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचबरोबर तंत्रज्ञान निर्देशांक नस्डॅकमध्ये 5 टक्क्यांची मोठी घसरण नोंदली गेली. तो 5945 अंकांच्या घसरणीसह 11458 च्या पातळीवर बंद झाला. याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसून येतो आहे. जपानचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स निक्केई 1 टक्क्यांनी खाली, चीनचा बेंचमार्क इंडेक्स शंघाई 1.5 टक्क्यांनी खाली आणि दक्षिण कोरियाचा निर्देशांक कोसी 1.50 टक्क्यांनी खाली आहे. मात्र , गुंतवणूकदारांनी घाबरू नये. कारण अशी आशा आहे की, बाजारात कमी पातळीवर खरेदी परत येऊ शकेल.

शेअर बाजारामध्ये जोरदार घसरण
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक सध्या (9:42 AM) जवळपास 590 अंक किंवा 1.5 टक्क्यांच्या कमजोरीसह खाली घसरून 38,400 वर आला आहे. दुसरीकडे एनएसई निफ्टी हा 50 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक, सुमारे 160 अंकांनी घसरून 11,355 वर आला आहे.

गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले
आज शेअर बाजारात सकाळी 9: 15 वाजता जोरदार घसरण झाली. पहिल्या 10 मिनिटांतच बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचे मूल्यांकन (बाजार भांडवल) 1,56,86,990.06 कोटी रुपयांवरून घसरून 1,54,74,987.03 कोटी रुपये झाले.

अमेरिकेचा बाजार का घसरला?
तज्ज्ञांनी सांगितले की, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एस अँड पी 500 मध्ये 55 टक्क्यांपेक्षा जास्त आणि नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात डावमध्येही 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. या घटानंतर आता विश्लेषकांचा असा विश्वास आहे की एवढी मोठी तेजी नंतर बाजार सुधारण्याची वेळ आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.