नवी दिल्ली । देशांतर्गत शेअर बाजारामध्ये प्रचंड तेजी आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बाजार नवीन उंचीवर खुला आहे. BSE सेन्सेटिव्ह इंडेक्स Sensex 31.62 म्हणजेच 0.06 वर 53,190.47 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 14.80 अंकांनी किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 15,939.00 वर उघडला. BSE च्या 30 शेअर्स पैकी 18 शेअर्सची वाढ होत आहे तर 12 शेअर्सची घसरण दिसून येत आहे. त्याचबरोबर NSE च्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्सची वाढ झाली आहे.
या शेअर्सना नफा झाला आहे
BSE मध्ये आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, डॉ. रेड्डी, रिलायन्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, एम अँड एम, टायटन, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, अल्ट्रा टेक सिमेंट, नेस्ले इंडिया, मारुती आणि टीसीएस शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.त्याचबरोबर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एलटी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरले.
आजचे टाॅप-5 लूजर्स आणि गेनर्स
आज NSE वर डिव्हिस्लाब, विप्रो, यूपीएल, सिप्ला आणि भारती एअरटेलचे शेअर्स तेजीत आहेत. दुसरीकडे, आयशर मोटोर, एचसीएल टेक, एलटी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस आज लूझर्स झालेले शेअर्स आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group