नवी दिल्ली ।संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान बाजार सपाट पातळीवर सुरू झाला आहे. मंगळवारी स्थानिक शेअर बाजारात थोडीशी वाढ झाली. BSE Sensex 53.91 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी वधारून 52,900.51 वर उघडला. NSE Nifty 15.00 अंक किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 15,849.35 वर उघडला.
या शेअर्समध्ये झाली वाढ
BSE मध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एलटी, टायटन, कोटक बँक, सन फार्मा, एचडीएफसी, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज ऑटो या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एनटीपीसी, डॉ. रेड्डी, एशियन पेंट्स, एम अँड एम आणि आयटीसी या शेअर्समध्ये घसरण झाली.
आजचे टॉप -5 गेनर्स आणि लूजर्स
ओएनजीसी, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, ग्रासिम हे गेनर्सच्या शेअर्समध्ये सामील झाले तर दुसरीकडे टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरले.
AMFI ने शेअर्सची श्रेणी बदलली
AMFI ने जूनपासून अनेक शेअर्सच्या श्रेणी बदलल्या. NMDC, APOLLO HOSPITALS, CHOLA INVESTMENT, SAIL, BOB, ADANI GAS ला मिडकॅपवरून लार्जकॅपवर हलविण्यात आले आहेत. त्याचबरोबर IGL, PETRONET, PI IND, HPCL सारख्या शेअर्सला लार्जकॅपमधून काढून मिडकॅपच्या श्रेणीमध्ये टाकले गेले आहे.
रिअल इस्टेटचे दिवस सुधारले
आज पुन्हा रिअल इस्टेट शेअर्समध्ये तेजी दिसून येईल. मालमत्ता खरेदी जोरदारपणे होत आहे. RBI च्या अहवालानुसार, विक्री न झालेल्या फ्लॅटची inventory मार्चअखेर 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा