नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 136.5 अंक किंवा 0.24% च्या वाढीसह 56,085.60 वर बंद झाला तर निफ्टी 57.00 अंक किंवा 0.34%च्या वाढीसह 16,693.90 वर बंद झाला. आज ट्रेडिंगच्या शेवटच्या सत्रात BSE च्या 30 पैकी 22 शेअर्स वाढीने बंद झाले आणि 8 शेअर्स घसरले तर NSE चे 50 पैकी 39 शेअर्स नफ्यावर आणि 11 शेअर्स घसरणीने बंद झाले.
BSE वर आज अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, डॉ. रेड्डीज, बजाज फिनसर्व, सन फार्मा, टीसीएस, कोटक बँक, एक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, एचडीएफसी, आयटीसी, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, एसबीआय, भारती एअरटेल ICICI बँक, बजाज ऑटो, टायटन आणि एशियन पेंटस यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. तर इंडसइंड बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स, मारुती घसरणीने बंद झाले.
जर आपण आज NSE वरील टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स बद्दल बोललो तर अल्ट्रा सिमेंट, हिंडाल्को, SBI लाइफ, LT आणि डॉ रेड्डी चे शेअर्स वाढले होते तर आज लूजर्समध्ये इन्फोसिस, इंडसइंड बँक, टाटा कन्झ्युमर आणि टेक महिंद्राचे शेअर्स होते.