Stock Market- शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात ! सेन्सेक्स 60,155 वर उघडला तर निफ्टी 17,937 वर

नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात रेड मार्कने झाली. BSE सेन्सेक्स 166.63 अंक किंवा 0.28% घसरून 60,155.74 अंकांवर उघडला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 61.65 अंकांनी किंवा 0.34% टक्क्यांनी घसरून 17,937.55 वर उघडला. शेअर बाजारातील 30 पैकी 18 शेअर्स तेजीसह ट्रेड करत आहेत. त्याचवेळी सर्वात मोठी घसरण एचडीएफसीच्या शेअर्समध्ये झाली आहे.

या शेअर्समध्ये झाली आहे वाढ
एनटीपीसीचा शेअर आज BSE वर 2.20% वर गेला आहे. एशियन पेंटचा स्टॉक 1.60% वर आहे. M&M च्या शेअर्समध्ये 1.88 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय पॉवर ग्रिड, मारुती, आयटीसी, बजाज ऑटो, एलटी, एसबीआय, सन फार्मा, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टायटन, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टायटन, नेस्ले इंडियाचे शेअर्स वधारत आहेत. याशिवाय एचडीएफसी, रिलायन्स, डॉ. रेड्डी, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, कोटक बँक, टीसीएस, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरले.

आजचे टॉप-5 गेनर्स-लुझर्स
एशियन पेंट, आयशर मोटर, टाटा मोटर्स, एसबीआय लाइफ, टाटा कंझ्युमर हे NSE वर टॉप-5 गेनर्समध्ये होते. त्याच वेळी, रिलायन्स, एक्सिस बँक, यूपीएल, डिवीज लॅब आणि एचडीएफसीचे शेअर्स घसरले आहेत.

You might also like