Stock Market शेअर बाजार आज एवढा का पडला? यामागील कारणे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोमवारी भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनी गॅप-डाउन उघडले आणि नंतर खाली घसरले. काही काळासाठी, शुक्रवारच्या बंदपर्यंत सेन्सेक्स 1879 अंकांनी घसरला होता आणि निफ्टी 575 अंकांनी घसरला होता. मात्र, शेवटच्या दीड तासात बाजार सावरला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले, जे दिवसभरात 3 टक्क्यांहून जास्तीने तुटले होते. मात्र प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहिला असेल की बाजारात असा गोंधळ का माजला ? बाजारातील घसरणीमागे अनेक कारणे आहेत.

शेअर बाजाराच्या जाणकार विश्लेषकांचे म्हणणे आहे की,” वाढती महागाई, ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटमुळे कोविड प्रकरणांमध्ये झालेला स्फोट, FII ची सततची विक्री आणि विकसित अर्थव्यवस्थांमधील मंद वाढ यामुळे बाजारातील घसरण झाली आहे.”

बाजारातील घसरणीची ‘ही’ काही प्रमुख कारणे आहेत
डॉलर उच्च पातळीवर : यूएस फेडरल रिझर्व्हने 16 डिसेंबर रोजी आपले धोरण जाहीर केले. यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केलेली नाही. महागाई वाढल्याने आणि बेरोजगारीचा दर घसरल्याने, फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की, ते जास्त वेगाने अर्थव्यवस्थेसाठीचे सपोर्ट कमी करेल आणि पुढील वर्षी तीन वेळा व्याजदर वाढवू शकेल. यानंतर डॉलरने नवीन शिखर गाठण्यास सुरुवात केली आणि बाजारात घसरण पाहायला मिळाली. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरही दिसून येत आहे.

व्हायरसचा धोका : अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी रविवारी अमेरिकन लोकांना बूस्टर शॉट्स घेण्याचे, मास्क घालण्याचे आणि हिवाळ्याच्या सुट्टीत प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. कारण जगभरातील ओमिक्रॉनचा धोका वाढतो आहे.

युरोपमध्ये लॉकडाऊन? : अनेक युरोपीय देशांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या आधी आणखी कोविड-19 निर्बंध लादले जाण्याची शक्यता वाढली आहे. नेदरलँडने आधीच लॉकडाउन जाहीर केले आहे. हे संकेत बाजारासाठीही वाईट परिस्थिती निर्माण करत आहेत.

जागतिक बाजारपेठ : चायनीज ब्लू चिप्स 0.4 टक्क्यांनी घसरले, तर MSCI चा जपानबाहेरील एशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक 0.8 टक्क्यांनी घसरला. जपानचे निक्केई 1.7 टक्के आणि दक्षिण कोरियाचे शेअर्स 1.2 टक्के घसरले. S&P 500 फ्युचर्स 0.8 टक्के आणि Nasdaq फ्युचर्स जवळपास 1 टक्के घसरले. EUROSTOXX 50 फ्युचर्स 1.1 टक्के आणि FTSE फ्युचर्स 1.0 टक्के घसरले.

Leave a Comment