शिरवळ येथील हाॅटेलमधून 58 लाखांचे मेडिकल साहित्याचा साठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | तालुक्यातील शिरवळ येथील साईचैतन्य या हॉटेलमधील एका रूममध्ये मेडिकलचे बेकायदेशीररीत्या साहित्य साठवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा अन्न व औषध विभाग व शिरवळ पोलिसांनी 57 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावर साईचैतन्य हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील रूममध्ये मेडिकलमध्ये विकले जाणारे साहित्य असल्याची माहिती शिरवळचे पोनि निरीक्षक महेश इंगळे यांना मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता साठा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याची माहिती औषध विभागाला दिल्यानंतर पुणे सहायक आयुक्त एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मनीषा जंवजाळ, औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी गुरुवारी दुपारी पथकासह छापा टाकला. हॉटेलच्या रुममध्येच औषधांचा साठा सापडल्याचे समोर आल्यानंतर शिरवळसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

अन्न विभागाने घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी सिरींज, कॅन्युला पिक्स, आयव्ही सेट, आयव्ही कॅथॅडर, टेन, फाईव्ह, टू एमएलच्या सिरींज असा साठा होता. पोलिसांनी सर्व मुद्देमालाच्या किंमती पाहिली असता ती 58 लाख रुपयांपर्यंत गेली. याप्रकरणी हॉटेल चालकाकडे चौकशी केल्यानंतर माऊली सर्जीकल अॅन्ड फार्मा डिस्ट्रीब्यूटर यांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी सुमारे पाच तास अन्न विभागाची कारवाई सुरु होती. कारवाई सायंकाळी झाल्यानंतर तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु होती.

Leave a Comment