आरोपीच्या घरावर दगडफेक : मिरजेतील अल्पवयीन मुलीवर केला होता बलात्कार

सांगली | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी फैयाज मेहबुब कोकणे यांच्या बोकड चौकातील घरावर व दुकानावर जमावाने दगड फेक केली. तुफान दगडफेकीत दुकानाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच कोकणे यांच्या चिकण दुकानाचे शटरही मोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी बोकड चौकात बंदोबस्त वाढविला आहे.

मिरजेतील बोकड चौक याठिकाणी चिकन दुकान चालवणाऱ्या फय्याज कोकणे या तरुणाकडून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला. कोकणे याचे बोकड चौक याठिकाणी चिकनचे दुकान असून त्या दुकानात चिकन खरेदी करण्यासाठी बारा वर्षाची मुलगी वारंवार येत होती. यातून फय्याज याच्याशी ओळख झाली. काही दिवसांपूर्वी फय्याज कोकणे याने पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून मुलीला अश्लील चित्रफित दाखवून आणि गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी संशयित फैय्याज कोकणे याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनतर पोलिसांनी कोकणे याला अटक केली आहे.

फैयाज कोकणे हा अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून त्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेवून मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले तसेच त्या मुलीला धमकीही दिली. मिरज शहर पोलिसात कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अज्ञातांनी आरोपीच्या घरावर जमावाने तुफान दगडफेक करून कोकणे चिकण शॉप या दुकानावरही तुफान दगडफेक केली. दुकानाचे शटर तोडून काढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

You might also like