कराड | कराड शहरातील बुधवार पेठेत रात्रीच्या वेळी डीजे सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीजे बंद करण्यास सांगायला गेलेल्या पोलिसांवरच सोळंवडे गॅंगकडून दगडफेक केली आहे. सदरची घटना बुधवारी दि. 7 रोजी मध्यरात्री घडलेली आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतलेले असून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात बुधवारी (दि.7) मध्यरात्री काही युवक डीजे लाऊन धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रात्र गस्तीचे पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी धिंगाणा घालणार्या युवकांना सदरचा प्रकार बंद करण्यास सांगितले. यावेळी युवकांनी पोलिसांना शिवीगाळ व त्यांच्यावर दगडफेक करून तेथून पळ काढला. पोलिसांनी युवकांचा शोध घेऊन याप्रकरणी पद्या (पूर्ण नाव) सोळवंडे यास ताब्यात घेतले तर त्याच्या सोबतचे अन्य साथीदार पसार झाले आहेत. पद्या सोळवंडे यास अटक केली असून त्याच्या सोबत असणार्या सुमारे 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने कराड शहर परिसरात खळबळ उडाली असून एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाकडून हे कृत्य करण्यात आले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित बाबर करत आहेत.