सातारा एसटी बसवर दगडफेक, दुचाकीवरून हल्लेखोर पसार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कास तलाव परिसरात अज्ञात इसमाने एस.टी बसवर दगडफेक केली. अचानक चालकाच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. झाडीत दबा धरुन बसलेल्यांनी दगडफेक केल्यानंतर दुचाकीवरून पळ काढला.

सातारा बसस्थानकातून बाहेर पडलेलीबस कास तलाव परिसरात आल्यानंतर अज्ञातांनी दगडफेक केली. सातारा- बामणोली – गोगवे या चालत्या बसवर अचानक दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. कास तलाव परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने दगडफेक करणारे झाडीत दबा धरून बसले होते. साताऱ्याहून गोगवे या मार्गावर आज सायंकाळी बस जात असताना ही दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत चालकाच्या बाजूची दरवाज्याची काच फुटली असून सुदैवाने चालकाला कोणतीही इजा झाली नाही. दगडफेक करणारे दुचाकीवरून पसार झाले आहेत. जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून या संपतील काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने संपात फूट पडली आहे. त्यामुळे दगडफेक कोणी केली यांचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कराड येथील सुर्ली घाटात आटपाडी बसवर दगडफेक केली होती. त्यानंतर आज पुन्हा बसवर दगडफेक करण्यात आली आहे.