औरंगाबाद – ज्या घटस्फोटीत महिलांचे महिन्याचे पगार 20 ते 25 हजार आहे अशा महिलांची कोर्टाने पोटगी बंद करावी अशी मागणी अतुल छाजेड यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास औरंगाबादेतील उच्च नायालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आज सुभेदारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, महिला खोट्या केसेस करून पुरुषांची छळवणूक करतात त्यांच्या छळाला कंटाळून काही पुरुषांनी आत्महत्या देखील केलेली आहे. आम्ही सरसगट पोरगी बंद करा असं नाही. फक्त ज्या महिला उच्चशिक्षित आहे व ज्या महिलांचे उत्पन्न वीस ते पंचवीस हजार आहे अशा महिलांना पुरुषांच्या पोटगी ची काय गरज म्हणून उच्च शिक्षित महिलांची पोटगी बंद करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अशा काही महिला आहे ज्या महिला चे उत्पन्न महिन्याकाठी 20 ते 25 हजार आहे अशा महिलांना नवऱ्याकडून पोरगी कशाला हवे असा सवाल अतुल छाजेड यांनी उपस्थित केला आहे.