अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत वसूल झाल्याशिवाय राहणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना पवार यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

परमबीर सिंग यांना अनिल देशमुख यांबाबत विचारले तेव्हा त्यांनी मला काही बोलायचे नाही असे उत्तर दिले होते. यावरूनच लक्षात येते कि देशमुखांवरील आरोप खोटे आहेत. आज तो अधिकारी पळून गेला आहे. ज्या अधिकाऱ्याला तोंड दाखवायला जागा नाही अशा अधिकारी आज बाहेर आहे अन अनिल देशमुख आत आहेत. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकारांचा गैरवापर. महाराष्ट्रातील सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. हेच लोक केंद्र सरकारला सांगतात कि यांच्याविरोधात नोटीस काढा असं पवार म्हणाले.

एकनाथ खडसे हे विरोधी पक्ष नेते होते. अनेक वर्ष भाजपात होते. ३०-३५ वर्ष ते विधानसभेत होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसेंच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यवर काही करता येत नाही म्हटल्यावर त्यांच्या पत्नीला चौकशीला बोलावलं. अजित पवार यांच्याबाबतीतही असेच झाले. त्यांच्या बहिणीच्या घरात लोक पाठवले. अशी किती उदाहर्ण सांगू असे म्हणत पवार यांनी भाजपच्या दबावतंत्राचा निषेध व्यक्त केला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/221540286769374

आपल्या हातातून महाराष्ट्र राज्य गेलं. ते आता परत मिळवता येत नाही यामुळे काही लोकांना त्रास देण्याचं काम भाजप कडून केले जातेय असा आरोप पवार यांनी केला आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो कि तुम्ही कितीहीही छापे टाका, कितीही अटक करा..आज ना उद्या हि सगळी शक्ती सामान्य माणूसाचा पाठिंबा घेऊन तुम्हाला या राज्यात पुन्हा कधीही येऊ देणार नाही असा इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला.

अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो असा शब्दात शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. सत्ता येते. सत्ता आली कि पाय जमिनीवर ठेवायचे असतात. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता डोक्यात जाते त्यांचे अवघड असते असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment