औरंगाबाद । औरंगाबादहुन जवळच असलेले, व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रगतशील गाव म्हणून करमाड प्रसिद्ध आहे. याठिकाणी डीएमआयसी प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे करमाड औरंगाबादकडे जाणारी मराठवाडा स्पेशल रेल्वे करमाड स्थानकावर थांबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करमाड येथे एमायडिसी हा प्रकल्प उभा राहत आहे. शैक्षणिक तसेच. शैक्षणिक तसेच नोकरी निमित्ताने औरंगाबाद असा प्रवास करणारे शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. मराठवाडा स्पेशल रेल्वे गाडी नंबर 07788 ही सकाळी साडेनऊ वाजता तर संध्याकाळी गाडी नं. 07787 हि 6 वाजून 23 मिनिटांनी या परिसरातून जाते. या दोन्ही वेळी करमाड स्थानकावर सदरील रेल्वे गाडी थांबत नाही. सदरील रेल्वे गाडी करमाड येथे थांबल्यास हजारो मजूर विद्यार्थी व नोकरदार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
त्यामुळे मराठवाडा स्पेशल रेल्वे करमाड स्थानकावर थांबविण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मिकी जाधव, भास्कर शेठ वानखेडे, एकनाथ डोके बाबासाहेब शिंगारे, अजय शेरकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.