सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे मेघा इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड ही कंपनी रस्त्याचे काम त्वरीत चालू करावे. सदरील रस्त्याचे काम 2 मार्च 2023 पर्यंत पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल रास्तारोको करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाअध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व तहसिलदार श्रीशैल वठ्ठे आणि पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना देण्यात आले.
या निवदेनात म्हटले आहे की, गोंदवले बुद्रुक हे महाराष्ट्रातील एक तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी असलेल्या ब्रम्हचैतन्य मंदिराला लागून सातारा- लातूर महामार्ग गेला आहे. या परिसरात असलेला रस्ता उखडलेला आहे. त्यामुळे भाविकांना व रहिवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. संबधित विभागाला याबाबत वारंवार माहिती देवूनही दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी शाळा असल्याने येत्या आठ दिवसात गतिरोधक बसविण्यात यावा. अन्यथा रास्ता रोको तसेच संबंधित कंपनीची वहाने फिरू देणार नाही.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर कट्टे, निलेश कट्टे, विशाल कट्टे, धिरज कट्टे, विश्वराज कट्टे, प्रथमेश नवले, लखन पारसे, विट्ठल जाधव, युवराज पाटिल, आशुतोष कट्टे, रोहित कट्टे, रणजित पडमलकर, प्रतीक सत्रे, रणजीत जाधव आदी उपस्थित होते.