कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
गोकुळ दूध संघाने पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता त्यानुसार शिवसेनेने आज शिवाजीपुलावर रास्ता रोको आंदोलन केले.
गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता पशुखाद्याच्या पोत्यामागे शंभर रुपये दरवाढ केली आहे. दूध उत्पादन खर्चाचा विचार करता, शेतकऱ्याला ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळं पशुखाद्याची दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता त्यानुसार शिवसेनेने आज शिवाजीपुलावर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी, गोकुळचे संचालक मंडळ वारेमाप खर्च करत आहे, मात्र यामध्ये काटकसर केली तर, दूध उत्पादकांना अधिकचा दर मिळेल. तसच दूध खरेदी दरात दोन रुपयांची दरवाढ करण्यात यावी, गायीचा दूध खरेदी दर 27 रुपये करण्यात यावा तसेच वासाचे दूध त्वरित बंद करून, यासह इतर मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्यात. जोपर्यंत गोकुळ दूध संघ शिवसेना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून दर वाढ मागे घेत नाही, तोपर्यंत जिल्हात टप्या टप्याने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.