बंद महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांची तुफान गर्दी; फॉर्म आणि फिस भरण्यासाठी कोरोना नियमाचे उल्लंघन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरामध्ये ब्रेक द चैन या अंतर्गत जे निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. शहर अनलॉक केल्याने सर्व बाजारपेठेसह सर्व उघडण्यात आले आहे मात्र शाळा महाविद्यालय अद्याप बंद आहेत. बाजारपेठेत नागरिक मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत मात्र आता महाविद्यालयात ही मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.

शाळा, महाविद्यालय तसेच धार्मिक स्थळ अद्यापही उघडण्यात आलेली नाही मात्र शहरांमधील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये डिग्री फॉर्म तसेच परीक्षा फार्म भरण्यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची अफाट गर्दी दिसून येत आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी रांगेने उभा आहेत त्यांच्यामध्ये कोणतेही सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जात नाही.

कोणतेही नियम न पाळता जर अशीच गर्दी महाविद्यालयांमध्ये राहिली तर पुन्हा एकदा कोरोना शहरात डोके वर काढेल आणि तिसरी लाट यायला काही वेळ लागणार नाही. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून येतात महाविद्यालयांमध्ये सकाळी आठ वाजेपासूनच विद्यार्थी विद्यार्थी रांगेमध्ये उभा आहेत आणि कोरोनाच्या कुठल्याही नियमाचे पालन केले जात नाही त्यामुळे संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment