व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य असलेली स्मृती मंधानानेही अलीकडेच ट्विटरवर प्रश्न-उत्तरांच्या सत्रात भाग घेतला आणि चाहत्यांच्या अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली.

आयसोलेशनच्या सध्याच्या वेळी स्मृती मंधानाने ट्विटरवर तिच्या चाहत्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला. तिने ट्विटरवर आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, एका चाहत्याने मंधानाला जेव्हा तिच्या क्रशबद्दल विचारले तेव्हा तिने बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचे घेतले.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी -२० वर्ल्डकपमध्ये ती भारतीय संघाची सदस्य होती. एका इंटरअ‍ॅक्टिव सेशनमध्ये एका चाहत्याने तिला विचारले की, तुमचा क्रश कोण आहे?,’ यावर मुंबईत जन्मलेली मंधाना म्हणाली,’ हृतिक रोशन… मी दहा वर्षांची असल्यापासून हृतिक माझा क्रश आहे.’

 

तसेच, इंस्टाग्रामवरील या प्रश्नाच्या सत्रात आपण काहीही विचारू शकता असेही मंधानाने यावेळी म्हटले. ‘ती सिंगल आहे की नाही याबद्दलही मंधानाला विचारले गेले. मंधानाने यावर उत्तर दिले, तिला स्वतःलाच माहित नाही. एका युझरने आपल्या लाइफ पार्टनरमध्ये तिला कोणते गुण पहायला आवडतील हे देखील विचारले. त्यावर तिने उत्तर दिले कि, पहिले त्याने माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्याला पहिला रुल फॉलो करावा लागेल.

 

 

जेव्हा तिला विचारले गेले की,’ तिला लव्ह मॅरेज करायचं आहे की अरेंज करायचं आहे, तेव्हा स्मृतीने एक अतिशय रंजक उत्तर दिले.

 

एका चाहत्याने तिला विचारले की, काय ती जेमिमा रॉड्रिग्जला मिस करतीये?, तर त्याबद्दल स्मृती जेमिमाबद्दल म्हणाली की, माझ्याशिवाय ती शांततेत असेल. दरम्यान जेमिमाने अलेक्साला डच पाकिस्तानी गायक इम्रान खान यांचे गाणे बेवफा ऐकवण्यास सांगितले. मंधानाने अलेक्साला सोनू के टीटू की स्वीटीतील गाणे ऐकवण्यास सांगितले.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.