Strait Of Hormuz Closed : तेल- गॅसच्या किमती गगनाला भिडणार!! इराण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Strait Of Hormuz Closed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Strait Of Hormuz Closed। इस्त्राईल -इराण युद्धाचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. काल अमेरिकन इराण वर हल्ला केल्यानंतर इराण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इराण होर्मुझची सामुद्रधुनी हा प्रमुख तेल वाहतूक मार्ग बंद करण्याचा विचार करत आहे. होर्मुझची सामुद्रधुनीतुन अनेक अरब देश तेल आणि वायू पुरवठा करतात. भारतासाठी सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची आहे कारण त्याच्या एकूण ५.५ दशलक्ष बॅरल आयातीपैकी सुमारे २ दशलक्ष बॅरल (bpd) कच्चे तेल या अरुंद जलमार्गातून जाते. त्यामुळे जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवली तर भारतात तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतात फक्त १६ दिवस पुरेल इतकाच LPG गॅस चा साठा शिल्लक असल्याचं बोललं जातंय.

जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून- Strait Of Hormuz Closed

होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन आखाताला अरबी समुद्र आणि हिंदी महासागराशी जोडते. ही ३३ किमी रुंद अरुंद वाहिनी इराणला (उत्तरेला) अरबी द्वीपकल्प (दक्षिण) पासून वेगळे करते. या सामुद्रधुनीच्या माध्यमातून आखाती देश तेल आणि गॅसच्या व्यापार करतात. परंतु आता अमेरिकन हल्ला केल्यानंतर इराण या सामुद्रधुनी याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास (Strait Of Hormuz Closed) भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो.

सौदी अरेबिया, इराक, युएई, कतार, इराण आणि कुवेत या आखाती देशांना तेलाची निर्यात करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा (Strait Of Hormuz Closed) वापर करावा लागतो. भारतासाठी, होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची आहे कारण त्याच्या एकूण ५.५ दशलक्ष बॅरल आयातीपैकी सुमारे २ दशलक्ष बॅरल (bpd) कच्चे तेल या अरुंद जलमार्गातून जाते. तथापि, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तरी भारताची झोप उडण्याची शक्यता नाही कारण रशियापासून अमेरिका आणि ब्राझीलपर्यंतचे पर्यायी स्रोत कोणत्याही पोकळी भरून काढण्यासाठी सहज उपलब्ध आहेत. रशियन तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून वेगळे असून सुएझ कालवा, केप ऑफ गुड होप किंवा पॅसिफिक महासागरातून वाहते. तर दुसरीकडे, गॅसच्या बाबतीत, भारताचा प्रमुख पुरवठादार कतार पुरवठा करण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी वापरत नाही. मात्र सध्या देशात फक्त १६ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅस शिल्लक असल्याचं बोललं जातंय.