नांदलापूर येथे क्राॅंसिंग रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगलोर महामार्गावर नांदलापूर फाटा येथे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर जवळपास 1 किलोमीटर अतंरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जखिणवाडी या गावाकडून आलेला एक ट्रक महामार्गावरील क्राॅसिंगवरून वळत होता. तेव्हा पुणेकडून कोल्हापूरच्या दिशेल्या निघालेल्या एका ट्रक (क्र. NP- 09 – GF- 9440) चालकाने जोराचा ब्रेक मारला. यावेळी पाठीमागून आलेल्या एका ट्रकने (MH- 04- DS- 0622) जोराची धडक दिली. तेव्हा पुढे वळण घेणाऱ्या ट्रकलाही धडक बसली.

या तीन वाहनांच्या अपघातानंतर वळण घेणारा ट्रक चालक तेथून वाहन घेवून पसार झाला. तर दोन्ही वाहन चालकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कोणीही जखमी झालेले नसले तरी अर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. महामार्गावर घटनास्थळापासून जवळपास 1 किमी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.