साताऱ्यातील शेतकऱ्यांची अजब मागणी : शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, नाहीतर गांजा लावण्याची परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना शेतात 1 एकर गांजा लावण्याची परवानगी मागितली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ही अजब मागणीचे निवेदन शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात आज मंगळवारी दि. 31 रोजी दिले आहे. तारगांव येथील सुनील संपत मोरे असे या शेतकऱ्यांचे नांव आहे.

कोरेगाव व कराड हद्दीवर असलेल्या तारगाव या गावातील सुनील संपत मोरे या शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. त्यामध्ये एक एकर शेतात गांजा लावण्याची परवानगी मागितली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, माझे स्वताःच्या मालकीची जमीन गट क्रमांक 1272 असून या एक एकर शेतात गांजा लावण्याची परवानगी द्यावी. मी एक शेतकरी असून माझ्या शेताला रस्ता नसल्याने कोणतेही पीक लावले तरी शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठिण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आणि गाजांला चांगला भाव मिळत असल्याने 1 आॅक्टोबरपर्यंत मला लेखी परवानगी द्यावी, अन्यथा 2 आॅक्टोबरला मी परवानगी मिळाली असे गृहीत धरून गाजांची लावगड करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला आपले प्रशासन जबाबदार राहील.

सदरील निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना देण्यात आल्याचे सुनिल मोरे यांनी सांगितले. यावेळी सुनिल मोरे म्हणाले, मागील चार वर्षापासून शेतात तर रस्ता नसल्यामुळे प्रशासनाला रस्त्याबाबत पाठपुरावा केला होता. संबंधित रस्त्याचा निकाल माझ्या बाजूने लागून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.