Strange Incident : अद्भुत!! आकाशगंगेत ‘शिव’ आणि ‘शक्ती’ची भेट; मिलनाचे दृश्य पाहून डोळे दिपतील

Strange Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Incident) या सुंदर विश्वात विविध ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. यातील काही थक्क करणाऱ्या तर काही हैराण करणाऱ्या असतात. पृथ्वीतलावर घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम चकित करत असतात. तशाच अंतराळात घडणाऱ्या घटना देखील एखाद्या रहस्यांपेक्षा कमी नाहीत. आजवर अवकाशात कैक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, काही गुपितं अशी असतात ज्यांचा उलघडा होणे जवळपास अशक्य असते. अशाच एका घटनेबाबत आज आपण माहिती घेत आहोत. ज्याविषयी जाणून तुम्हाला केवळ आश्चर्य वाटणार नाही तर तुम्ही पूर्णपणे थक्क होऊन जाल. ही एक अशी घटना आहे जिने संशोधनकरते, अंतालाविषयक अभ्यासक, खगोल शास्त्रज्ञांनादेखील हैराण करून सोडलं आहे.

अद्भुत घटना (Strange Incident)

ESA म्हणजेच युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत अंतराळात घडलेल्या एका दृश्याची काही चित्र समोर आली आहेत. ज्यामध्ये ‘शिव’ आणि ‘शक्ती’ नामक ताऱ्यांचे अद्भूत मिलन पहायला मिळाले आहे. आकाशगंगेतील या घटनेबाबत जाणून सगळेच भरून पावले आहेत. आकाशगंगेच्या निर्मितीमध्ये ‘शिव’ आणि ‘शक्ती’ या ताऱ्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. ज्यांचे मिलन ही अत्यंत अद्भुत घटना आहे.

गाया दुर्बिणीचा वापर

ESA संस्थेने गाया दुर्बिणीचा वापर करून ही अद्भुत घटना संपूर्ण जगासमोर आणली आहे. शिव आणि शक्ती हे अत्यंत प्राचीन तारे असून त्यांचे मिलन हि घटना आतापर्यंत अवकाशात घडलेल्या अद्भुत घटनांपैकी एक आहे. या ताऱ्यांची उत्पत्ती अनेक अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. (Strange Incident)

रहस्यमयी आकाशगंगा

आकाशगंगेत अनेक तारे, ग्रह, लघुग्रह, खगोलीय पिंड आणि सौरमालेचा समावेश आहे. आकाशगंगेचा व्यास हा साधारण १००,००० प्रकाशवर्ष आहे. नुकत्याच समोर आलेली ही अद्भुत घटना अत्यंत रहस्यमयी सिद्ध झाली आहे. शिव आणि शक्ती या दोन ताऱ्यांच्या मिलनाचं दृश्य समोर आल्यानंतर आता आकाशगंगेत घडणाऱ्या इतर रहस्यांबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. (Strange Incident)