व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजब प्रकार : आरोग्य यंत्रणेचा आईचा ‘घो’, जिवंत युवकाला फोन तुमचा कोरोनाने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका जिवंत युवकाला मृत घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चक्क कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या फलटणमधील युवकाला त्याच्याच फोनवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी युवकासह कोरोना मृत्यू झाल्याची बातमी दिली. त्यामुळे अनेकांनी आरोग्य यंत्रणेच्या आईचा ‘घो’ असा सूर आळवला असल्याचे पहायला मिळाले.

फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले ( वय २०) असे या युवकाचे नाव आहे. सिद्धांतची गेल्या महिन्यात दि. 7 मे रोजी त्याची कोरोना टेस्ट पॅझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे. सोमवारी (7 जून) सिद्धांत घरीच असताना त्याचा मोबाईल खणखणला सिद्धांतने फोन उचलला असता, पलिकडील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकूण सिद्धांतला काही सुचेना. त्याने’ हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बाब सांगितली

आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र निरोप देत आहेत, असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले . एकंदरीतच या घटनेमुळे कालपासून भोसले कुटुंब चक्रावलेवल्या अवस्थेत आहे जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत भोसले कुटुंबियांनी याप्रकरणी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.