Strawberry Moon : आज आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’चे दर्शन घडणार; ज्याचा लग्नानंतरच्या ‘HoneyMoon’शी आहे खास संबंध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strawberry Moon) चंद्राकडे पाहिलं की, अत्यंत शांत आणि शितल वाटतं. कितीही डागाळलेला असला तरीही आकर्षक आणि सुंदर दिसणारा चंद्र रोज आकाराने बदलत असतो. ज्याला ‘चंद्रकला’ म्हणतात. मात्र, चंद्राची काही रुपं डोळ्यात साठवून घ्यावी इतकी सुंदर असतात. जसे की, ‘स्ट्रॉबेरी मून’. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय ‘स्ट्रॉबेरी मून’. चंद्राच्या विविध रूपांची विविध नावे आहेत. यांपैकी एक म्हणजे ‘स्ट्रॉबेरी मून’. हा चंद्र आज आकाशात पाहता येणार आहे.

दिनांक २० जून ते २२ जून दरम्यान अर्थात आज २१ जून रोजी आकाशात स्ट्रॉबेरी मूनचे (Strawberry Moon) दर्शन घडणार आहे. हे चंद्राचे सर्वोत्तम रूप आहे जे पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. माहितीनुसार हा चंद्र धनु राशीत चमकणार आहे आणि याचा थेट ‘हनीमून’सोबत संबंध आहे. चला या ‘स्ट्रॉबेरी मून’विषयी अधिक माहिती घेऊया.

‘स्ट्रॉबेरी मून’ नाव कसे पडले?

उत्तर अमेरिकेत या काळात स्ट्रॉबेरीची फळे काढली जातात. त्यामुळे, उत्तर अमेरिकेतील अल्गोनक्वीन जमातीच्या लोकांनी या चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव दिले आहे. त्यामुळे चंद्राच्या या अत्यंत सुंदर रुपाला बरीच लोक ‘स्ट्रॉबेरी मून’ (Strawberry Moon) म्हणून ओळखतात. तर काही ठिकाणी या स्ट्रॉबेरी मूनला हॉट मून, हनी मून आणि रोज मून असेही म्हणतात.

स्ट्रॉबेरी मून दिसतो कसा? (Strawberry Moon)

आजपर्यंत अनेक तज्ञांनी या चंद्राचे निरीक्षण केले आहे. त्यानुसार या तज्ञांचे म्हणणे आहे की, हा चंद्र सोनेरी म्हणजेच सोन्याच्या रंगासारखा पिवळा दिसतो. मात्र त्यावर हलका लाल रंगाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. मात्र, यावेळी वातावरणाचा वरील पट्ट्यात कोणती रसायने अधिक प्रमाणात आहेत यांचा प्रभाव यावर दिसून येतो. याशिवाय तज्ञांनी म्हटले, कोणत्याही पौर्णिमेला चंद्राचे रूप पाहणे फारच मनमोहक आणि अलौकिक असते. मात्र, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याच्यावरील खड्डे, पर्वत, दऱ्या, इम्पॅक्ट क्रेटर दिसून येतात.

स्ट्रॉबेरी मूनचा ‘हनीमून’शी खास संबंध

युरोपीय लोक स्ट्रॉबेरी मूनला ‘हनी मून’ असे संबोधतात. याचे कारण असे की, यावेळी मधाचे पोळे तयार झालेले असते आणि त्यातून मध काढण्याची वेळ आलेली असते. आता लग्ना नंतरच्या ‘हनीमून’बद्दल बोलायचं झालं तर त्यासोबत देखील या चंद्राचा संबंध आहे. हनीमून हा शब्द १५०० च्या दशकापासून वापरला जात आहे. (Strawberry Moon) या कालावधीत जगभरातील अनेक देशांमध्ये जंगी विवाह सोहळे पार पडतात. त्यामुळे लोक लग्नानंतर हनिमूनसाठी बाहेर कुठेतरी फिरायला जातात. त्यानुसार या चंद्राला ‘हनी मून’ म्हणूनही ओळखले जाते.