औरंगाबाद | राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतुदींची कठोरपणे अंमलबजावणी करून तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिल्या. त्याच बरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस आरोग्य आणि अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त कारवाईवर भर द्यावा असेही निर्देश दिले.
पोलीस आयुक्तालयात जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची बैठक मकवाना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. पी. एम. कुलकर्णी महापालिकेच्या डॉ. अर्चना राणे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. ए यमपुरे रावसाहेब जोंधळे, कार्यक्रमांचे जिल्हा सल्लागार डॉक्टर अमोल काकड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक पोलिस स्थानकास चालान पुस्तिका वितरीत करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील अहवालही सादर करण्याबाबत मकवाना यांनी सूचना दिल्या बैठकीचे प्रास्ताविक डॉक्टर काकडे यांनी केली आहे.