कडक लाॅकडाऊन ः कराड, सातारा शहरात पोलिसांकडून गाड्या जप्त, वाहनचालकांची पळापळ

सातारा | सातारा जिल्ह्यात आजपासून सात दिवसांच्या कडक लाॅकडाऊनला प्रारंभ झाला आहे. कराड शहरात तसेच सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त करून त्यांच्यावर केसेस दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी चांगली तारांबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सर्वंत्र सकाळी सात ते अकरा सुरू असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक बिनधास्त किरकोळ कारणांसाठी बाहेर पडताना फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणार्‍या शेकडो दुचाकी जप्त केले आहेत. अनेक वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान सातारा शहरात बाॅम्बे रेस्टारंट चाैकात, पोवई नाका, सातारा बसस्थानक, मोळाचा वडा, सातारा- लोणंद मार्गावर आणि बोगदा परिसरात पोलिसांनी चोख बदोबंस्त ठेवण्यात आला आहे. तर कराड शहरात कोल्हापूर नाका, भेदा चाैक, कृष्णा कॅनाल त्याचबरोबर विजय दिवस चाैकात नाका-बंदी सुरू केली आहे. पोलिस सर्व वाहनांची कसून तपासणी करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करून पुन्हा तपासणी मोहीम सुरू केली. कारणाशिवाय फिरणारी वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

सातारा शहरात तीन तासात 70 वाहने ताब्यात

सातारा जिल्हा पोलिस ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना प्रसाद देण्यात सुरुवात पोलिसांचा सकाळ पासूनच सुरूवात केली होती. कारणाविना फिरणाऱ्यांवर कारवाईचाही बडगा उगारला आहे. सकाळी अकरापर्यंत 70 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत.

You might also like