‘मिशन बिगेन अगेन’चे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सध्याची कोवीडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेनमधील तरतुदी 15 एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या मिशन बिगेन अगेनच्‍या गाईडलाईन्‍सची जिल्‍हयामध्‍ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर तसेच संबंधित अधिकरी उपस्थित हेाते. सुरूवातीला जिल्‍हाधिका-यांनी महाराष्‍ट्र शासनाचे मिशन बिगेन अगेन या आदेशातील सर्व नियमांचे सविस्‍तर सादरीकरण करुन कोवीड-19 आपत्‍ती काळात नियम न पाळणा-या नागरिकांवर करण्‍यात येणा-या  कारवाईबद्दल माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, मिशन बिगेन अगेन आदेशाची अंमलबजावणी करताना कोविड-19 काळात नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी वॉर्डनिहाय्य तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात यावे. या पथकात  जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे 2 व पोलीस प्रशासनाचा 1 कर्मचारी असे प्रत्‍येकी 3 पर्यवेक्षक असावेत. तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक असावा. महापालिकेतील गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डामध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे 4 पर्यवेक्षकांचे पथक असावे ज्यामध्ये 1 कर्मचारी हा महानगर पालिकेचा असेल. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत. प्रत्येक पथकांमार्फत कोवीड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-या  दैनंदिन किमान 100 वाहनांवर कारवाई करावी. रिक्षामध्‍ये प्रत्‍येकी दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना 50 टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सुचना देण्‍यात याव्‍यात.  राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने आपल्‍या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची 5 पथके तयार करावीत.

प्रत्येक  पथकांनी शहरातील राज्‍य उत्‍पादन शुल्‍क च्‍या अखत्‍यारीतील दुकाने राञी वेळेत बंद होण्‍याच्‍या अनुषंगाने व कोवीड प्रतिबंधित नियमांचे पालन करण्यासंबंधी कारवाई करावी तसेच नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन किमान 10 आस्‍थापनांवर कार्यवाही करण्‍यात यावी. तसेच इतर वेळी हॉटेल आसनक्षमतेच्‍या फक्‍त 50 टक्‍के क्षमतेने चालू राहतील याबाबत लक्ष ठेवावे नियमांचे पालन व्‍हावे यासाठी अन्‍न व औषध प्रशासनाने तीन पथके गठीत करुन नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन प्रत्येकी किमान 20 आस्‍थापनांवर कारवाई करावे, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी आदेशित केले. शनिवार व रविवारचा लॉकडाऊन कायम राहणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment