सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे.
याबाबतची माहिती अशी, सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेले 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे आज सकाळी कर्मचाऱ्यांनी पगार कधी मिळणार, अशी विचारणा केली. तेव्हा ठेकेदाराने दुपारी 12 नंतर पगार मिळेल असे सांगितले. त्यावर कर्मचाऱ्यांनी पगार झाल्यानंतर काम करणार असल्याचे ठेकेदाराला सांगितले. यावरून वाद झाला.
ठेकेदाराने कर्मचारी सुजित गाडे याला यावेळी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचारी व ठेकेदार यांच्या वादामुळे सातारकर वेठीस धरले जात आहेत. तेव्हा आता पालिका अधिकारी काय भूमिका याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष आहे. पगाराचा वाद दुसऱ्यांदा झाला आहे.