Stroke | आपल्या भारताने खूप प्रगती केली आहे. अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लावला. त्याचप्रमाणे आजकाल तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात होतो. या सगळ्यामुळे माणसाची जीवनशैली देखील बदललेली आहे. आणि या बदललेल्या जीवनशैलीचा मानवाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे. माणसाचा आहार त्याचप्रमाणे इतर गोष्टींमुळे त्यांच्या दिनचर्येमध्ये बदल झालेला आहे. त्यांच्या वाईट जीवनशैलीमुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये हृदयविकाराचा झटका पक्षापातासारखे केसेस आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहे. खास करून तरुणांमध्ये या गोष्टी झपाट्याने वाढत आहेत.
नुकतेच काही दिवसापूर्वी झिरोधाचे सीईओ नितीन कामत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सांगितले की त्यांना पक्षापाताचा झटका आला होता. एवढ्या तंदुरुस्त व्यक्तीला पक्षाघाताचा झटका कसा येऊ शकतो असे अनेकांना वाटले. त्यामुळेच पक्षाघात हा एक प्राणघातक आजार असल्याचा समोर आलेले आहे. त्यामुळे आपण आधीपासूनच खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. आता हा स्ट्रोक (Stroke) नक्की काय असतो तो कसा येतो आणि तो टाळण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया.
स्ट्रोक म्हणजे काय ?
स्ट्रोक (Stroke) आपल्या शरीरातील अशी एक स्थिती आहे, ज्यावेळी आपल्या मेंदूच्या पेशींपर्यंत योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होत नाही. त्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशी हळूहळू खराब होऊ लागतात. आणि मेंदूचे ते भाग नीट काम करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्या जीवासाठी घातक देखील ठरू शकते. यासाठी अगदी काही सेकंद देखील पुरेसे असतात. म्हणूनच या स्ट्रोकची (Stroke) लक्षणे वेळेत ओळखणे आणि वेळेवरच डॉक्टरांकडे जाणे या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आता या स्ट्रोकचे नक्की किती प्रकार आहेत ते पाहूयात.
स्ट्रोकचे प्रकार | Stroke
स्ट्रोकचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. रक्तवाहिन्या बंद पडल्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही आणि मेंदूच्या पेशी खराब व्हायला लागतात या सगळ्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी कमी होते याला इस्केमिक स्ट्रोक असे म्हणतात
त्याचप्रमाणे हेमोरोजिक स्ट्रोक (Stroke) हा स्ट्रोकचा दुसरा प्रकार आहे. यामध्ये मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून किंवा फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू होतो. त्याला रक्तस्त्राव स्ट्रोक असे म्हणतात. या सगळ्यामुळे मेंदूच्या पेशींवर दबाव येतो आणि हळूहळू मेंदू खराब होऊ लागतो. अनेकवेळा या स्ट्रोकमध्ये मेंदूच्या आणि कवटीच्या मधल्या जागामध्ये रक्त जमा व्हायला सुरू होते.
स्ट्रोकची लक्षणे कोणती असतात ?
- शरीराच्या एका बाजूला अर्धांग वायू येतो किंवा आपल्याला खूप अशक्तपणा येतो.
- मोठ्या प्रमाणात डोकेदुखी जाणवते.
- सतत चक्कर येते.
- सातत्याने उलट्या होतात.
- तोल सांभाळण्यात किंवा चालण्यामध्ये अडचण येते.
- चेहऱ्याचे एका बाजूला झुकणे.
- बोलण्यात अडचणी येणे.
- दृष्टी कमी होणे.
- स्मृति गमावणे.
स्ट्रोक कसा टाळायचा ? | Stroke
- स्ट्रोक टाळण्यासाठी सगळ्यात आधी तुमचा रक्तदाब नियंत्रित असणे खूप गरजेचे आहे.
- तुमच्या कोलेस्ट्राची पातळी देखील नियंत्रणात ठेवा.
- वजनावर देखील नियंत्रण ठेवा.
- दररोज व्यायाम करा. दररोज पुरेशी झोप घ्या.
- सकस आणि ताजा आहार घ्या.
- दारू त्याचप्रमाणे धूम्रपान या गोष्टींपासून लांब राहा.
- रक्तातील साखरे साखरेची पातळी नियंत्रित ठेवा.