Strowberry Farm | शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. म्हणजे शेतात पिके घेतली जातात. सुरुवातीला तांदूळ, गहू यासारखी पिके घेतली जायची. परंतु बाजरीची मागणी पाहता शेतकरी बाजरी, ज्वारी यांसारखे पिके देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु शेतकऱ्यांना आधीच्या तुलनेत आता चांगली नफा होताना देखील दिसत आहे. त्यामुळे आता शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पीक शेतात घ्यायला लागलेली आहेत. जरी एखाद्या वर्षी तोटा सहन करायला लागला तरी, त्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती मिळते. आणि पुढे काय करावे याबद्दल देखील त्यांना अंदाज येतो.
सरकार देखील आता शेतकऱ्यांनी नवीन पीक लावावीत आणि त्याचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी नवीन पिके घेण्यात प्रोत्साहित करत असते. एका शेतकऱ्याने आपल्या नशीब बदलले आहेत आणि फक्त बारा महिन्यात या व्यक्तीने तब्बल 24 लाखांचा व्यवसाय केले आहे. बर आता या शेतकऱ्यांनी नेमकं कोणतं पीक घेतले आहे? ते कशाप्रकारे घेतले आहे? आणि त्याला एवढा फायदा कसा झाला याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बिहारमधील या शेतकऱ्याचे नाव पंकज साह असे आहे. हा शेतकरी बिहारच्या जमुई जिल्ह्यातील खैरा परिसराच्या सिंगापूर येथे राहतो. त्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. आणि भरपूर नफा कमवला आहे. पंकज यांनी सुमारे 1 एकरमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. आणि त्या स्ट्रॉबेरीच्या पिकातून त्यांना आतापर्यंत 24 लाखांचे उत्पादन मिळाले आहे. आता पिकाला इतकी मागणी आली आहे किती पूर्ण करणे देखील त्यांना आता शक्य होत नाही.
पंकज साह हे आधीपासूनच शेती व्यवसाय करायचे. परंतु चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्यांनी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला. आणि त्यानंतर त्यांनी शेतात जरा स्ट्रॉबेरीची लागवड करावी. अशी त्यांना कल्पना सुचली त्यांनी त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले. आणि 2020 पासून ते सातत्याने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले. बाजारात देखील स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातून आणि महाराष्ट्रातून देखील मागणी आहे.आणि ही मागणी ते पूर्ण करतात. परंतु आत्ता एवढी वाढ झाली आहे की, त्यांना ती मागणी देखील पूर्ण करायला जमत नाही.
12 महिने 24 लाखांचा व्यवसाय | Strowberry Farm
पंकजांनी सांगितले की, ही तीन महिन्यांची शेती असते. स्ट्रॉबेरीच्या झाडांना लागवडीनंतर 45 दिवसांनी फळे येतात. आणि ती तोडून बाजारात विकता येतात. या तीन महिन्यात जुने पीक आहे ते बाजारात विकले जाते. तीन महिन्याच्या सिझनमध्ये शेतकऱ्यांना सहा ते सात लाख रुपयांचा व्यवसाय होतो. आत्तापर्यंत त्यांनी चार सीजन मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. केवळ स्ट्रॉबेरीच्या पिकातून त्यांना आतापर्यंत 24 लाखांचा व्यवसाय केला आहे. आणि आगामी काळातही ते स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे.