पाहा Video: स्टुअर्ट ब्रॉडने असा घेतला कसोटी क्रिकेटमधील ५००वा बळी

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मँचेस्टर । इंडिजविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ५०० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठणारा ब्रॉड हा सातवा खेळाडू ठरलं आहे. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श (२००१), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (२००४), श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन (२००४), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२००५), भारताचा अनिल कुंबळे (२००६), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (२०१७) यांनी हा पराक्रम केला आहे.

असा घेतला ५००वा बळी
इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने ३१ धावांत ६ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजने दिवसअखेर गमावलेले २ गडी ब्रॉडनेच घेतले. तेव्हा ब्रॉडचे ४९९ बळी झाले होते. ५००वा बळी टिपण्यासाठी त्याला एका दिवसाची वाट पाहावी लागली. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, आज, पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने संयमी सुरूवात केली. क्रेग ब्रेथवेट बचावात्मक खेळत असतानाच ब्रॉडने त्याचा बळी टिपला आणि कसोटी क्रिकेटमधील आपला ५००वा गडी घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here