गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षणासाठी ‘एसएफआय’चा लढा

0
44
sfi logo
sfi logo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | नवनाथ मोरे

सर्वांना मोफत भेदभाव विरहित गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षण या मागणीला घेऊन स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे देशभरात लढे सुरू आहेत. मध्यप्रदेशमधून निघालेल्या जत्थ्याचे आगमन महात्मा फुले वाडा पुणे येथे झाले. या जत्थ्याला संबोधित करताना अखिल भारतीय महासचिव डाँ.विक्रमसिंग म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे चांगले स्कुल शिक्षण हे ज्यांचे आई-वडिल शेती, शेतमजूर,मनरेगावर काम करतात. त्यांना चांगले शिक्षण पाहिजे. शिक्षण हे सामाजिक, नैतिक संविधानिक दृष्ट्या आमचा हक्क आहे.पण आज ते नाकारले जात आहे.शिक्षण हे विचार करण्याची क्षमता निर्माण करते.परंतु त्या पध्दतीचे शिक्षण आज दिसत नाही. ते मिळेपर्यंत लढाई चालू राहणार आहे.
आरएसएस प्रणित सरकार आल्यानंतर सरकार विरोधात बोलणाऱ्यांना नक्षलवादी,देशद्रोही ठरविले जात आहे. तर आज शिक्षण हे ज्याच्या खिशात पैसा त्याच्यासाठी अशी परिस्थिती झाली आहे असे प्रतिपादन राज्यध्यक्ष मोहन जाधव यांनी केले.
या व्यवस्थेने एकलव्याचा अंगठा घेतला,परंतु आज एकलव्यप्रमाणे शिक्षण नाकारले जात असेल तर त्याविरोधात निर्धाराने लढण्याचे प्रतिपादन राज्य सदस्य मंजूश्री कबाडे यांनी केले.
यावेळी राज्य सचिव बालाजी कलेटवाड, राज्य सदस्य विलास साबळे,राज्य सदस्य राजु शेळके, गणेश नागरगोजे,संदिप मरभळ,अक्षय रघतवान,देविलाल बागूल,रवि साबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here