युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी पोहोचला सांगलीत, केंद्र सरकारने उपाययोजना केली नसल्याची व्यक्त केली खंत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली मधील विश्रामबाग परिसरात राहणारा तोहीद मुल्ला हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेला होता. गेल्या आठवड्यापासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु असल्याने हजारो विद्यार्थी त्याठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. यातील तोहीद मुल्ला हा सुखरूप सांगली मध्ये पोहोचला. त्याने युक्रेन ते सांगली पर्यंतचा थक्क करणारा प्रवास यावेळी सांगितला. तसेच केंद्र सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे त्याने यावेळी सांगितले.

सांगलीतल्या विश्रामबाग परिसरात राहणार तोहीद बशीर मुल्ला हा २०१८ साली एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन इथल्या नॅशनल युनिव्हर्सिटी येथे गेला होता. युनिव्हर्सिटी पासून तीन किलोमीटर अंतरावर एअर पोर्ट आहे. त्याच्या समोरच मिलिटरी बेस आहे. त्याठिकाणी पहाटे स्फोट झाल्यानंतर मुल्ला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जाग आली. त्यांनी बाहेर पहिले असता आकाशातून फायटर प्लॅन धावत होते.

त्यांनी तातडीने भारतीय दूतावासांशी संपर्क साधला त्यावेळी सांगण्यात आलं कि, तुमची युनिव्हर्सिटी जेंव्हा ऑनलाईन होईल तेंव्हा तुम्ही जाऊ शकता. मात्र, युद्ध सुरु होई पर्यंत युनिव्हर्सिटी मध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु होते. त्यामुळे त्यांना निघेता आले नाही. युद्ध सुरु होताच काही विद्यार्थ्यांनी विमानाचे तिकीट काढले होते. मात्र, सदरची विमाने हि रद्द करण्यात आली. त्यामुळे सदरचे विद्यार्थी हे तेथून बाहेर पडले. तब्बल आठवड्याच्या त्रासानंतर मुल्ला हा सांगलीत दाखल झाला.