परीक्षा रद्द होताच औरंगपुऱ्यात विद्यार्थांचा धिंगाणा; शेकडो विद्यार्थानी अडविला रस्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : या महिन्यात होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळताच औरंगाबाद शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी औरंगपुरा भागात गोळा होत रस्त्यावरती धिंगाणा घालत रस्ता अडविला यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

14 मार्च रोजी एमपीएससी ची परीक्षा होणार होती मात्र कोरोनाच्या कारणाने ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही माहिती वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरताच पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरु असतानाच औरंगाबाद शहरातील औरंगपुरा,गुलमंडी या भागातील शेकडो विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले चौकात एकत्र आले.व जोरधार घोषणाबाजी करीत परीक्षा त्वरित घेण्याच्या मागणी साठी मुख्य रस्ता अडविला.

विद्यार्थी रस्त्यावरच ठिय्या मांडून आहेत.अचानक झालेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कल्पना नसल्याने पोलिसांची देखील तारांबळ उडाली. पोलिस प्रशासन देखील विद्यार्थ्यांची समजूत काढत असून विद्यार्थी एकण्याचे मनस्थितीत न्हवते. या निर्णयाला विरोधात विद्यार्था मध्ये प्रचंड राग दिसून आला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment