औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एम फिलची परीक्षा शुल्क माफ करण्यात यावेत अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या वतीने कुलगुरू प्रमोद येवले यांना निवेदन देण्यात आले.
विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणावर ती साकारण्यात येत आहे. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे विद्यार्थी फिस भरू शकत नाही. विद्यापीठात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे त्यांना फीस भरायला अडचण निर्माण होत आहे. म्हणून विद्यापीठ प्रशासनाकडून फीस माफ करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी गुरुंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सत्यशोधक विध्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अमोल खरात, जिल्हाध्यक्ष निशिकांत कांबळे, विद्यापीठ अध्यक्ष श्रद्धा खरात, राज्य कमिटी सद्यस्य सुरेश सानप, लक्ष्मीकांत जाधव, दीपक पाईकरव, सोनू मिरासे, मनीषा बल्लाळ हे विद्यार्थी उपस्थित होते.