ब्रिटिश संशोधकांचा दावा,”कोलेस्टेरॉलचे ‘हे’ औषध कोरोना विषाणूचा धोका 70% पर्यंत कमी करू शकते”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन । कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध Fenofibrate कोरोनाव्हायरसचा धोका 70 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. ब्रिटनच्या बर्मिंघम विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधकांचा दावा आहे की, या औषधात असलेले Fenofibrate एसिड कोविडचे संक्रमण कमी करते. सुरुवातीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्येही हे सिद्ध झाले आहे. Fenofibrate एक ओरल ड्रग आहे. हे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्त देखील आहे. जगभरातील बहुतेक ड्रग अथॉरिटीनी कोलेस्टेरॉलच्या रुग्णांवर औषधाच्या वापरास मान्यता दिली आहे.

संशोधक एलिझा व्हिसेन्झी म्हणतात,”या संशोधनाचे निकाल दर्शवतात की, Fenofibrate मध्ये कोरोना संसर्ग गंभीर होण्यापासून रोखण्याची क्षमता आहे. तसेच विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यात मदत होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे औषध त्या लोकांना दिले जाऊ शकते ज्यांना लस दिली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, हायपर इम्यून डिसऑर्डरने ग्रस्त असलेली मुले आणि रुग्ण.

कोरोनाच्या ओरिजनल स्ट्रेनवर प्रयोग केला
शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी प्रयोगशाळेत कोरोनाच्या ओरिजनल स्ट्रेनने संक्रमित झालेल्या पेशींवर Fenofibrate औषधाचा परिणाम पाहिला. परिणामी, संसर्गाचा धोका 70 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. अमेरिका आणि इस्रायलमधील रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर हे औषध आजमावले जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की,”हे औषध कोरोनाच्या अल्फा, बीटा स्ट्रेन्सवरही प्रभावी आहे.”

डेल्टा स्ट्रेनवर परिणाम तपासत आहे
संशोधकांचे म्हणणे आहे की,”कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन अत्यंत धोकादायक आहे. या स्ट्रेनवर Fenofibrate औषध किती प्रभावी आहे यावर संशोधन केले जात आहे. याचे निकाल लवकरच जाहीर केले जातील.”

Leave a Comment